महाराष्ट्रातील सध्याची राजकिय परिस्थिती पाहून केंद्राने शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढविली आहे.
या आधी त्या सर्व आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. पण उद्या शिंदे गटातील आमदार गोव्यातून मुंबईला येणार आहेत. तसेच उद्या मविआ सरकारची बहुमत चाचणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आज ३ विशेष विमानांतून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) २००० जवान मुंबई मध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय राज्य पोलिसांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातून गोव्यात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आलाय. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. शिवसेनेच्या व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रक्षोभक भाषणे करू नये तसेच बॅनरबाजी व ईतर गोष्टी ज्यामुळे वातावरण बिघडले जाण्याची शक्यता आहे असे कोणतीही वर्तन करू नये अशा आशयाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
Vision Abroad