मुंबई :पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले.
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, संपूर्ण देशातील अशी जी काही राज्य आहेत, ज्यांनी शिक्षणात प्रगती केली आहे, त्यांचं नाव आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षणामध्ये विभागाने दौरे केले. त्यात केरळने शिक्षण विभागात अनेक प्रयोग केले, अनेक इनिशिएटिव्ह केरळने शिक्षणात घेतले आहेत. काही मॉडेल जे यशस्वी झालेत ते पुढे न्यावे लागतात. केरळ आणि महाराष्ट्राची तशी तुलना करता येणार नाही. पण केरळसोबत पंजाब, राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत, विद्यार्थी फोकस सुधारणा आम्ही राज्यात करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
दप्तराचे ओझे कमी
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता यापुढे पुस्तकांमध्ये सरावासाठी कोरी पाने जोडली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेगळ्या वह्या घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.
Vision Abroad