MSRTC NEWS : एसटी महामंडळात बसगाडय़ांवर वाहक म्हणून महिला असतानाच प्रथमच महिला चालक बसचे स्टेरिंग हातात घेणार आहेत. औरंगाबाद येथे मागील एक वर्षांपासून १६३ महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या मार्च अखेर हे प्रशिक्षण पूर्ण करून एप्रिल महिन्याच्या सुरवातीस महाराष्ट्राच्या रस्त्यावर प्रत्यक्ष महिला बसचालक एसटी बस चालवताना दिसतील असे महामंडळातर्फे सांगितले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी महिला चालक ह्या पदाकरिता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने चालक-वाहक म्हणून आदिवासी व दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिला चालकांची भरती करण्याची प्रक्रिया साधारण मार्च २०१९ मध्ये सुरू झाली. मात्र करोना निर्बंध, बेमुदत संपामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. त्यांचे बंद झालेले प्रशिक्षण गेल्यावर्षी मार्च मध्ये पुन्हा सुरु झाले होते.
(Also Read>चिपळूणला लोककला महोत्सवाचे आयोजन..)
मार्चअखेर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल, त्यानंतर त्यांची एक दिवसाची अंतिम चाचणी घेतली जाईल. उत्तीर्ण होणार्यांना बस चालविण्याची परवानगी मिळेल. नापास होणाऱ्यांना पुन्हा १० दिवसांचे प्रशिक्षण देऊन एक संधी दिली जाईल. त्यानंतरहि नापास होतील त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल असे एसटी प्रशिक्षण विभागाचे वाहतूक निरीक्षक अनंत पवार म्हणाले आहेत.
(Also Read>सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचा वावर…..)
Facebook Comments Box
Vision Abroad