पेण: २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई ठाणे ह्या शहरांतून पालीसाठी दहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा गाड्यांसाठी प्रवाशांनी आजच आपले आरक्षण निश्चित करण्याचे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अष्टविनायकांपैकी एक स्थान असणाऱ्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी माघी गणेशोत्सवाला मोठी यात्रा भरत असते. त्यातच यंदा २५ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा होत असल्याने दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने या यावर्षी दरवर्षी पेक्षा भक्तांची जास्त गर्दी अपेक्षित आहे. याचा विचार करून एसटी महामंडळाने दहा जादा गाड्या मुंबई-ठाणे ह्या शहरातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच दहा गाड्यांव्यातिरिक्त पेण आगारातील चार बसेस, रोहा आगारातील दोन बसेस, अलिबाग आगारातील दोन बसेस आणि कर्जत आगारातील दोन बसेस अशा एकुण आणखी दहा बसेस पाली बस स्थानकातून लोकल प्रवासासाठी सज्ज ठेवण्याचा निर्णय देखील एसटी महामंडळाने घेतला आहे.
जादा गाड्यांचा प्रवाशांनी पुरेपूर वापर करून घ्यावा आणि आपले आरक्षण लवकरात लवकर निश्चित करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या आरक्षणासाठी प्रवाशांनी एमएसआरटीसी मोबाईल ॲप आणि msrtc च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन आरक्षण निश्चित करावे असे एसटी महामंडळाकडून सूचित करण्यात आले आहे.
(Also Read >महाराष्ट्रात लवकरच दिसणार आहेत महिला एसटी बसचालक….)
महामंडळाच्या जादा गाड्या
24 जानेवारी
ठाणे ते पाली (17: 00 वाजता)
मुंबई ते पाली (17:00 वाजता)
बोरिवली ते पाली (17: 00वाजता)
25 जानेवारी
ठाणे ते पाली ( 5:30 वाजता)
मुंबई ते पाली (6:00 वाजता)
बोरिवली ते पाली (6:00 वाजता)
26 जानेवारी
पाली ते ठाणे ( 15: 00 वाजता)
पाली ते ठाणे ( 16: 00 वाजता)
पाली ते मुंबई ( 17:00 वाजता)
पाली ते बोरिवली ( 18:00 वाजता)
(Also Read>चिपळूणला लोककला महोत्सवाचे आयोजन..)
Vision Abroad