Konkan Railway News : कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने फेब्रुवारी आणि मार्च या २ महिन्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावर एक आठवडी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण तिच्या विचित्र वेळापत्रकामुळे तिचा फायदा कोकणवासीयांना होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Train no. 01454 Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly) दर शनिवारी ही गाडी सुरतकल या स्थानकावरुन संध्याकाळी 7:40 वाजता सुटणार आहे. या गाडीची सावंतवाडी स्थानकावर येण्याची वेळ रात्री 01:52, कुडाळला 02:24 , सिंधुदुर्गला 02:36, कणकवलीला 02:52, रत्नागिरीला 05:55 तर संगमेश्वर या स्थानकावर पहाटेचा 06:50 असा आहे. या विचित्र वेळेला स्थानकावर पोहोचून गाडी पकडणे खूपच गैरसोईचे आहे. त्यामुळे तळकोकणातील प्रवाशांसाठी ती असून नसल्यासारखी आहे.
(हेही वाचा >आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आणि होळीसाठी कोकण रेल्वेची विशेष गाडी…)
कोकणातील बहुतेक स्थानके मुख्य शहरापासून दूर आहेत. संध्याकाळी 7 नंतर एसटीची सेवा बंद होते. खाजगी वाहतुक दिवसा परवडत नाही तर रात्रीचे विचारूच नका. बहुतेक रस्ते निर्जन आणि जंगल भागातून जाणारे आहेत त्यामुळे अनेक समस्या येतात. रात्री जंगलातील प्राणी (खासकरून गवा रेडा) सर्रास रस्तावर येत असल्यामुळे या रस्त्यांतून रात्रीचा प्रवास करताना दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.
याआधी असेच विचित्र वेळापत्रक आखून विशेष गाड्या चालविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या विशेष गाड्या कोकणच्या प्रवाशांसाठी सोडल्या जात आहेत की दक्षिणेकडील प्रवाशांसाठी सोडल्या जात आहे असा प्रश्न कोकणातील प्रवाशांकडून विचारला जात आहे.
आंगनेवाडी जत्रा दक्षिण राज्यातली माणसं कधी पासून साजरा करू लागले हे समजलं नाही