पालघर – आपल्या आईला लांबवर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत असल्याने पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील प्रणव रमेश सालकर या नववी इयत्तेतील, १४ वर्षीय मुलाने स्वतःच्या अंगमेहनतीने घराच्या परिसरात खड्डा खोदत खोदत विहीर खोदली आहे. या विहिरीला १५ फुटावर पाणी लागले आहे. प्रणव च्या कार्यामुळे त्याचे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातून कौतुक होत आहे.
आईची तळमळ पाहून प्रणव ने विहीर खोदायला घेण्याचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद होता. पण कौतुक करताना दुसरी बाजू पण लक्षात घेतली गेली पाहिजे. आई बाबा मजुरीला गेले असताना त्याने चार दिवसात ही विहीर एकट्याने खोदली असल्याचे सांगितले आहे. १४ वर्षाचा एकटा बिनअनुभवी, निरागस मुलाला या कामात असणाऱ्या धोक्याचीही कल्पना नसेल. विहीर खोदताना कठडा कोसळून तो मातीखाली येण्याची शक्यता होती. इतरही काही अपघाताच्या शक्यता होत्या. मुलाचा हेतू चांगला असला तरी पालकांनी अशा गोष्टी करताना मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते.
आजकाल गावोगावी सोशल मीडिया भलताच ट्रेंड आहे. कित्येक मुले सोशल मीडियावरील काही गोष्टींचे अनुकरण करताना दिसतात. प्रसारमाध्यमांनी या बातमीला प्रसिद्धी दिली तसेच सोशल मीडियावर पण ही बातमी खूप प्रसारित झाली. या बातमीमुळे काही लहान मुले प्रणव चे अनुकरण करायचा प्रयत्न करतील. या दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपली मुले असे काही करत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे.
Facebook Comments Box
आपण नकारात्मक विचार पहिला करतो, ही बातमी वाचल्यानंतर किती लोकांच्या मुलांनी विहीर खोदायला सुरवात केली? कुठेही नाही. कारण मुलं बातम्या वाचत नाहीत, कधीही चांगल्या गोष्टी घेत नाहीत, मुळात त्यांना गेम खेळण्यात, फाजीलपणा करण्यासाठी जादा रस असतो हे सत्य जास्त आहे.