मुंबई: सोशल मीडियावर इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेवरून सध्या वाद होतोय. या कवितेवरून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या दर्जावर, निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कवितेत अस्वल, हत्ती, कोल्हा, वाघ, लांडगा, मुंगी, ससा, अशा प्राण्यांचा उल्लेख आहे. पण, या कवितेत काही हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये बात, शोर असे हिंदी शब्द, तर माउस, वन्समोअर अशा इंग्रजी शब्दांचा वापर झालाय. त्यामुळे या कवितेवर आक्षेप घेतला जातोय. ही कविता कोणत्या निकषांवर बालभारतीच्या पुस्तकात निवडण्यात आली? असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जातोय. ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजे’ या नावानं फेसबुकवर ग्रुप आहे. या ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी सोमवारी सकाळी या कवितेचा फोटो या ग्रुपमध्ये शेअर केला होता
दीपक केकसरकर यांचे समर्थन
समाज माध्यमांवर मराठी भाषा प्रेमींनी मोठ्या यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसकर यांनी मात्र या कवितेचे समर्थन केले आहे. “वन्स मोअर” या शब्दाला पर्यायी मराठी शब्द आहे का? यमक जुळवण्यासाठी इंग्रजी शब्द वापरला तर त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. आपण ‘टेबल’ हा इंग्रजी शब्द मराठीत सर्रास वापरतोय” अशा शब्दात त्यांनी या कवितेचं समर्थन केले आहे.
Facebook Comments Box