Konkan Expressway: विद्यमान सरकारने देशातील सर्व शहरे महामार्गाने जोडण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई आणि गोवा जोडणारा एक नवा महामार्ग म्हणून कोकण द्रुतगती महामार्ग Konkan Expressway बांधण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कोकण एक्सप्रेसवे (ME-6) हा पनवेल (नवी मुंबई) आणि सिंधुदुर्गला रायगड आणि रत्नागिरी मार्गे जोडणारा महाराष्ट्रातील मार्ग संरेखन असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएसआरडीसीने महामार्गासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
एमएसआरडीमार्फत कोकण द्रुतगती द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा द्रुतगती महामार्ग 375.94 किमी लांबीचा असून तो कोकणातून जाणार आहे. एकूण १७ तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. तर संपूर्ण मार्गावर १४ इंटरचेंज असणार आहेत. महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीला सुमारे ८७१ छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग चार पॅकेजमध्ये तयार करण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे.
कोकण एक्स्प्रेसवेसाठी 68 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई ते गोवा अंतर 523 किमी आहे. कोकण एक्स्प्रेसवे प्रकल्पासाठी सुमारे 3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे.
मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 12 ते 15 तास लागत आहेत.
रचना तपशील
- छोटे पूल : ४९
- प्रमुख पूल : २१
- रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) : ३
- वायडक्ट्स : ५१
- बोगदे : ४१
- वाहन ओव्हरपास (VOP) : ६८
- वाहन अंडरपास (VUP) : ४५
- इंटरचेंज : १४
- टोल प्लाझा : १५
- वेसाइड सुविधा : ८
Facebook Comments Box
Vision Abroad