मडगावः इतर राज्यातील तुलनेत गोवा राज्यात मद्य स्वस्त आहे. त्यामुळे गोव्यातून आजूबाजूच्या राज्यात तस्करी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येतात. मात्र आता तर गोव्यातून मद्याची तस्करी करताना रेल्वेचा वापर करत असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यात मद्याची तस्करी केली जात असतानाच आता गुजरातमध्ये कोकण रेल्वेमार्गे दारू नेली जात असल्याचे उघड झाले आहे. रेल्वे पोलीस दारू पकडतात. मात्र त्याचे प्रमाण नगण्य असते. मद्यमाफिया व पोलीस यंत्रणा यांचे साटेलोटे असल्याने हा धंदा बिनधास्त सुरू आहे.
अन्य राज्याच्या तुलनेत गोव्यात मद्य स्वस्त आहे. गुजरातमध्ये तर दारूबंदी आहे. गोव्यातून दुसऱ्या राज्यात अनेक वर्षांपासून मद्य चोरट्यामार्गे नेले जात आहे. हल्लीच गुजरात राज्यातील अबकारी अधिकारी मडगावात चौकशीसाठी आले होते. सुरत येथे मद्यसाठा पकडला होत. तो मडगावातून नेण्यात आला होता, असे तपासात उघड झाले होते.
पकडण्यात आलेल्या संशयितांनी मडगावातील एका दारू होलसेलवाल्याचे नाव सांगितल्याने पुढील तपासासाठी अधिकारी मडगावात आले होते. नंतर त्यांनी याबाबत फातोर्डा पोलिसांना त्याबाबत कल्पना दिली होती. दरम्यान, मागच्या वर्षी कोकण रेल्वे पोलिसांनी दारूची एकूण ७ प्रकरणे नोंद करून दहाजणांना पकडले होते.
एका पोलिस अधिकाऱ्याने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर बोलताना सांगितले, या मद्य तस्करीत बडी धेंडे गुंतलेली असतात. त्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे अनेकदा माहिती असूनही कारवाई करता येत नाही.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभिय...
महाराष्ट्र
Mumbai Goa Highway | अर्जुना नदीवरील पुलाला भाई हातणकर यांचे नाव; जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये ठरा...
कोकण
खुशखबर! पुणे – सिंधुदुर्ग मार्गावर ‘फ्लाय९१’ कडून गणेशोत्सवासाठी विशेष उड्डाणांची घोषणा
कोकण