मुंबई :आज दिनांक-20.11.2022 रोजी दादर मुंबई येथे जनआक्रोश सभा कोकणकरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सभा आयोजकांनी सदर सभेला 25 सामाजिक प्रतिष्ठान, संस्था, संघटना यांनी पाठींबा दिला आहे असे अशी माहिती दिली आहे. याच 25 संघटनेचे सभासद अंदाजित 01 लाखाच्या वर असून नक्कीच याचा फायदा जनआक्रोश आंदोलनाला होईल.तसेच 180 कोकणकर या सभेला उपस्थित राहिले.या सभेला कोकणकरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर सभेत जे काही शेवटी निर्णय घेण्यात आले त्यांची माहिती खालील प्रमाणे-
1. मुंबई गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती अस नाव विचारात आणले आहे.
2. विविध 12 प्रकारच्या कमिटी असून ज्या सदस्यांना कोणत्याही कमिटीवर काम करावयाचा इच्छा असेल तर उद्या पाठविण्यात येणारा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून सादर करावा यामधून नियुक्ती लवकरात लवकर करण्यात येईल.
3.ऑनलाईन पोर्टलद्वारे विविध माध्यमातून पत्र पाठविण्यात येतील.
4. गडकरी साहेब,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,आमदार,खासदार यांना पत्रव्यवहार करून अधिवेशन मध्ये मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गस्थ लावणे.
5.अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना सरकारकडून मदत जाहीर करणे व यापुढे खराब महामार्गमुळे एखादा अपघात झाला तर प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करणे.
6.जर हे महामार्ग 2023 मध्ये पूर्ण झाले नाही तर लोकप्रतिनिधी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा आशयचे पत्र देऊन त्यांच्याकडून पोचपावती घेणे.
7. यापुढे कोकणातील कोणतेही लोकप्रतिनिधी ट्रेन, विमानने कोकणात जाण्यासाठी वापर करीत असतील तर त्यांना अडवून महामार्गानेच प्रवास करावे अन्यथा जनआक्रोशच्या वतीने निषेध म्हणून आक्रमक भूमिका घेण्यात येईल.
8. जो पर्यंत पनवेल ते झारप 471 किलोमीटरचा रस्ता वापरण्यायोग्य व 100% काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये.
9. बनविण्यात येणारा रस्त्या हा 10 वर्षात एकही खड्डा पडणार नाही अशी लेखी हमी देऊन नियमावली बनविण्यात यावी जेणेकरून बनणारा रस्त्या उत्तम दर्जाचा असेल.
10.जनजागृतीकरीता ठिकठिकाणी सभा आयोजित करून याबाबत जनआक्रोश कशासाठी आहे यासाठी माहिती देणे.
11. या वरील विषयात सरकार कडून दिरंगाई दिसत असेल किंवा 01 मे 2023 पर्यंत काम पूर्ण होईल अशा पद्धतीचे स्वरूप दिसत नसेल तर आझाद मैदान ते मंत्रालय असा जनआक्रोश आंदोलन उभारून मंत्रालयाला घेराव घालणे.
12.जो पर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व कोकणकरांच्या वतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येईल.
यांसारख्या अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.
सदर सभेतील चर्चा खालील लिंक वर बघू शकता.
Vision Abroad