गणेशचतुर्थीसाठी आरक्षित तिकीट मिळवण्याची अजून एक संधी; विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर

   Follow us on        

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, या गाड्यांचे बुकिंग (आरक्षण) ०८ सप्टेंबर २०२६ पासून अधिकृतपणे सुरु होत आहे.

​आरक्षणाची तारीख जवळ आल्याने कोकणात जाणाऱ्या भक्तांनी तिकिट बुकिंगसाठी पूर्वतयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​आरक्षण आणि तिकीट विक्रीची सविस्तर माहिती

​आरक्षणाची सुरुवात: ०८ सप्टेंबर २०२६

​कसे कराल आरक्षण?

​ऑनलाइन बुकिंग: IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) व मोबाईल ॲपवर.

​ऑफलाइन बुकिंग: सर्व संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर (PRS Counter).

​अनारक्षित (General) गाड्यांचे तिकीट: पनवेल-चिपळूण मेमू सेवांसाठी UTS प्रणालीद्वारे किंवा ‘रेलवन’ (RailOne) ॲपद्वारे सामान्य शुल्कात तिकीट काढता येईल.

​गाड्यांचे वेळापत्रक व मार्ग

​१. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव विशेष (४ आरक्षित सेवा)

​गाडी क्र. ०१००३ (LTT ते मडगाव): LTT वरून सकाळी ०७:५० वा. सुटेल व त्याच दिवशी रात्री ११:४५ वा. मडगावला पोहोचेल (फेऱ्या: १६.०९.२०२६ व १९.०९.२०२६).

​गाडी क्र. ०१००४ (मडगाव ते LTT): मडगाववरून सायंकाळी ०४:०० वा. सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०५ वा. LTT येथे पोहोचेल (फेऱ्या: १५.०९.२०२६ व १८.०९.२०२६).

​डब्यांची रचना: ३ एसी तृतीय श्रेणी (3AC), ८ स्लीपर (Sleeper) आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

​मुख्य थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.

​२. पनवेल – चिपळूण – पनवेल (३० अनारक्षित मेमू सेवा)

​पनवेल आणि चिपळूण दरम्यान ३० फेऱ्या चालवल्या जातील (१५.०९.२०२६ ते १७.०९.२०२६ दरम्यान या सेवा बंद राहतील).

​अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search