मुदत संपलेल्या पॅकेटवर बनावट तारखांचे स्टिकर्स लावण्याचा प्रकार; नवी मुंबईत ४.१४ कोटींच्या मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त

​अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नवी मुंबई गुन्हे शाखेने तुर्भे येथील धाडीत मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवर नवीन तारखांचे स्टिकर्स लावून विक्री करणारा मोठा रॅकेट उघडकीस आणला आहे.

​या कारवाईत तब्बल ५.७५ कोटी रुपये किमतीचे ४,१४२ पुठ्ठ्याचे बॉक्स आणि इतर बनावट साहित्य जप्त करून संबंधित पेढीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

   Follow us on        

​नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमध्ये असलेल्या ‘साधना एंटरप्रायझेस’ या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस गुन्हे शाखेने संयुक्तपणे छापा टाकला. या कारवाई दरम्यान गोदामात ठेवलेल्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवरील मूळ उत्पादनाची तारीख आणि ‘बेस्ट बिफोर’ (वापराची मुदत) पुसून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी या पाकिटांवर बनावट तारखा, घटक आणि पोषणमूल्यांची माहिती असलेले नवीन स्टिकर्स लावले जात होते.

​संबंधित ठिकाणी केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना तब्बल ५.७५ कोटी रुपये मूल्याचे ४,१४२ खोके खाद्यपदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या या साठ्यामध्ये लेस (Lays), कुरकुरे (Kurkure), बिन्गो (Bingo), फन फ्लिप (Fun Flips), मॅगी (Maggi), रसोई (Rasoi), नॉर (Knorr), हेलमन्स (Hellmann’s), थम्स अप (Thums Up) आणि लिम्का (Limca) यांसारख्या अत्यंत लोकप्रिय ब्रँड्सचा समावेश आहे. हा संपूर्ण माल एकूण १० वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे.

​या मुख्य साठ्याव्यतिरिक्त, पथकाने तेथून ३०,६०० रुपये किमतीचा असा अन्नपदार्थ देखील ताब्यात घेतला आहे, ज्यावर कोणत्याही प्रकारचे लेबल नव्हते आणि ज्याची मुदत पूर्णपणे टळून गेली होती. आरोपी केवळ तारखा बदलत नसून, मूळ कंपन्यांच्या पॅकेजिंगची तंतोतंत नक्कलबाह्य स्वरूपात तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

​या गंभीर गैरप्रकाराप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ (FSSAI) तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराची दखल घेत ‘साधना एंटरप्रायझेस’ या संस्थेचा अन्न परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search