३ सप्टेंबरला धावणार उद्घाटनाची विशेष गाडी
Follow us onमुंबई : कोकणवासीयांसाठी आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्र. १५०८७/१५०८८) सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या सेवा पर्वाचा प्रारंभ करण्यासाठी गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड उद्घाटन विशेष गाडी’ (गाडी क्र. ०१००१) चालवण्यात येणार आहे.
उद्घाटन विशेष गाडीची वेळ आणि वेळापत्रक (गाडी क्र. ०१००१):
ही विशेष गाडी ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १४:३० वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (४ सप्टेंबर) पहाटे ०३:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ५०९ किलोमीटरचे हे अंतर ही गाडी १३ तासांत पूर्ण करेल.
* मुंबई सीएसएमटी: दुपारी १४:३० (प्रस्थान)
* दादर: १४:४२ / १४:४५
* ठाणे: १५:०२ / १५:०५
* पनवेल: १५:४७ / १५:५०
* पेण: १६:३८ / १६:४०
* रोहा: १७:५७ / १८:००
* रत्नागिरी: रात्री २२:०५ / २२:१०
* कणकवली: मध्यरात्री ००:४० / ००:४२
* कुडाळ: पहाटे ०१:४० / ०१:४२
* सावंतवाडी रोड: पहाटे ०३:३० (आगमन)
(याशिवाय माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरावली रोड, संगमेस्वर रोड, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवरही गाडीला व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत).
आधुनिक एलएचबी (LHB) डब्यांची सोय:
ही ट्रेन अत्याधुनिक १६ एलएचबी (LHB) डब्यांसह धावेल. यामध्ये १ फर्स्ट एसी, २ सेकंद एसी, ३ थर्ड एसी, ४ स्लीपर क्लास आणि ४ सामान्य डबे समाविष्ट असतील.
या नियमित दैनिक एक्सप्रेस ट्रेनचे (१५०८७/१५०८८) नियमित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या नवीन सेवेची नोंद घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


