Per Capita Income: दरडोई उत्पन्नात कोकण विभागाने नेहमीप्रमाणे आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. २०२३-२४ वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
कोकण प्रदेशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न ३,६४,६६८ रुपये एवढे आहे, जे इतर प्रदेशांच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त आहे. मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरांच्या समावेशामुळे या भागात दरडोई उत्त्पन्न जास्त आहे.
तर पुणे २,७७,४५३ रुपये दरडोई उत्पनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर नागपूर विभाग २,२५,७५५ रुपये दरडोई उत्पन्नासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख नागरी आणि औद्योगिक केंद्रे आहेत.
महाराष्ट्रातील प्रदेशांमध्ये लक्षणीय आर्थिक असमानता आहे. पश्चिमी प्रदेश (कोकण, पुणे) साधारणपणे जास्त उत्पन्न दाखवतात नाशिकचे दरडोई उत्पन्न १,९७,२२७ रुपये ईतके आहे तर अमरावती विभागातील दरडोई उत्पन्न तुलनेने कमी म्हणजे १,४५,९१७ रुपये आहे. संभाजीनगर १,७३,५३३ रुपये उत्पन्नासह मध्यम श्रेणीत आहे.
कोकण विभागात जास्त दरडोई उत्पन्न दाखवत असले तरी येथेही जिल्ह्या जिल्ह्यांत मोठी असमानता आहे. मुंबई आणि मुंबईला चिटकून असलेले जिल्ह्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र जस जसे तळकोकणच्या दिशेने जायला लागलो तर हा विकास कमी कमी होत झालेला लक्षात येतो.
Average Per Capita Income in Maharashtra in INR .
Key Highlights:
🔸 The Konkan region has the highest per capita income at ₹3,64,668, significantly higher than other regions. This likely reflects the presence of Mumbai and its economic influence in this area.
🔸 Pune shows… pic.twitter.com/kAtDgiA9Wo
— The Maharashtra Index (@TheMahaIndex) December 25, 2024
Facebook Comments Box
Vision Abroad