Mumbai Goa Highway:मुंबई गोवा महामार्गाचे काम काही केल्या पूर्णच होत नाही आहे. कोकणवासीयांना मिळत आहेत त्या पुढे ढकलत जाणाऱ्या फक्त तारखा! गेल्या १७ वर्षांपासून या महामार्गाचे रखडले काम, सुमार दर्जाचे काम या महामार्गावरून नेहमीच टीकेची झोड उठत आहे. हे कमी होते म्हणून की काय या महामार्गाविषयी नकोशी वाटणारी अजून एक बातमी समोर आली आहे.
कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना शासनाचा साडे नऊ कोटी कर थकविल्याचे उघडकीस आले आहे. गौण खनिज उत्खननाचा कर (रॉयल्टी) न भरल्याने जिल्हा प्रशासनाकडून या कंपन्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. या चार ही कंपन्यांना जिल्हा प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांनी सुमारे साडेनऊ कोटी एवढा कर थकविला आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या काम वेगाने सुरु आहे. या कामाचे सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका देण्यात आला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले. मात्र दुसऱ्या कंपन्यांना हे काम देण्यात आले. डिसेंबर २०२५ हा महामार्ग पुर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दुसरा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाचा कर भरला नसल्याचे पुढे आले आहे. महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉयल्टी भरलेली नाही.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये कर थकविला आहे. इलोक्टॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस), ईगल इन्फ्रा प्रा, लि (मकरंद गांधी),चेतक इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा अशी त्या चार कर बुडविणाऱ्या कंपनीची नावे आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad