मुंबई: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत विविध राज्यांमध्ये एकूण ७,१५० अप्रेंटिस (Apprentices) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (Advt.No. CRPD/APPR/2026-27/07) जारी केली आहे. महाराष्ट्रात ५०४ जागा रिक्त असून, ८ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदांचा तपशील आणि महाराष्ट्रातील स्थिती:
या भरती प्रक्रियेत राज्यानुसार जागांची विभागणी करण्यात आली असून, उमेदवारांना संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान होना आवश्यक आहे.
महाराष्ट्र (मराठी): ५०४ पदे (खुला प्रवर्ग – २२५, इमाव – १३५, अजा – ५०, अज – ४४, ईडब्ल्यूएस – ५०). यामध्ये २१ पदे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव आहेत.
इतर राज्ये: गुजरात (२१७ पदे), आंध्र प्रदेश (७०९ पदे), कर्नाटक (२७६ पदे), मध्य प्रदेश (२८५ पदे), गोवा (१६ पदे).
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांनुसार रिक्त जागा:
पुणे (२०), नाशिक (१६), रायगड (१५), औरंगाबाद/छ. संभाजीनगर (१४), सोलापूर (१४), कोल्हापूर (१३), सांगली (१३), नागपूर (१३), सातारा (१३), अहमदनगर (१३), अकोला (१२), अमरावती (१२), लातूर (१२), नांदेड (१२), उस्मानाबाद (१२), परभणी (१२), जळगाव (१२), बीड (११), जालना (११), गडचिरोली (११), गोंदिया (११), धुळे (११), नंदुरबार (११), बुलढाणा (१०), वाशिम (१०), भंडारा (१०), चंद्रपूर (१०), वर्धा (१०), हिंगोली (१०), मुंबई आणि मुंबई उपनगरे (१०), रत्नागिरी (४), सिंधुदुर्ग (३).
पात्रतेचे निकष:
१. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. वयोमर्यादा (दि. १ एप्रिल २०२६ रोजी): उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे (उमेदवाराचा जन्म १ एप्रिल २००६ ते २ एप्रिल १९९८ च्या दरम्यान असावा). नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल: इमाव (OBC) – ३ वर्षे, अजा/अज (SC/ST) – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.
ट्रेनिंग कालावधी आणि विद्यावेतन (Stipend):
निवड झालेल्या उमेदवारांना १ वर्षाचा ट्रेनिंग कालावधी पूर्ण करावा लागेल. या कालावधीत अप्रेंटिसना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिले जाईल.
निवड पद्धती आणि परीक्षा स्वरूप:
उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषेची परीक्षा या आधारे केली जाईल.
ऑनलाईन परीक्षा: ही परीक्षा जुलै २०२६ मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख केंद्रांवर आयोजित केली जाईल. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० प्रश्न (१०० गुण) असतील आणि वेळ ६० मिनिटे असेल.
विषय: (१) जनरल/फायनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह ॲप्टीट्यूड, (४) रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टीट्यूड. प्रत्येक विषयाला २५ प्रश्न असतील.
नकारात्मक गुण: चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.
स्थानिक भाषेची परीक्षा: ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ही परीक्षा होईल. मात्र, ज्या उमेदवारांनी १० वी किंवा १२ वीत स्थानिक भाषा (मराठी) अभ्यासली आहे, त्यांना ही परीक्षा देण्याची गरज नाही.
परीक्षा शुल्क:
खुला/इमाव/ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS): रु. ३००/-
अजा/अज/दिव्यांग (SC/ST/PWD): परीक्षा शुल्क नाही (मोफत).
भविष्यातील मोठा फायदा:
स्टेट बँक ऑफ इंडियामधून अप्रेंटिसशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना बँकेतील ‘ज्युनिअर असोसिएट’ (Junior Associate – लिपिक वर्ग) पदाच्या भविष्यातील भरतीमध्ये विशेष वेटेज / सूट देण्यात येईल.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी https://bank.sbi/careers किंवा https://sbi.co.in/careers या संकेतस्थळावर जाऊन ८ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी https://bfsissc.com किंवा NAPS पोर्टल https://apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.


