२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव निश्चित – खा. विनायक राऊत

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे २०२४ ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे. 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “३४ मतदारसंघाची यादी पाहिली नाही. पण, कार्यकर्त्यांच्या विश्वासावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा उमेदवारी देतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, नारायण राणे लोकसभा निवडणुकीत उभे राहिले, तर अडीच लाख मतांनी त्यांचा पराभव करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे,” असं विनायक राऊत यांनी सांगितलं.
“केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे दिल्ली सोडून जिल्हा नियोजनाच्या बैठकीला येऊन बसतात. त्यांच्या खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याला राणेंनी पुन्हा सेवेत घेतलं. त्या अधिकाऱ्याने पदाचा दुरुउपयोग करुन नारायण राणेंच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार केला,” असं विनायक राऊत यांनी म्हटलं.
तसेच, “त्या अधिकाऱ्याने दोन तरुणींची फसवणूक करुन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे लवकरच नारायण राणेंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे,” असा दावा विनायक राऊत यांनी केला.
‘इंडिया टुडे’ आणि सी-वोटर’चा एक सर्वे समोर आला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर, शिंदे गट आणि भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. त्या पार्शवभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search