कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी – थिवी समर स्पेशल ट्रेन; आरक्षण उद्यापासून खुले..

Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने एक आठवड्यातुन तीन दिवस धावणारी एक  समर स्पेशल गाडी चालविणार आहे.

Train No. 01129 / 01130 Lokmanya Tilak (T) – Thivim – Lokmanya Tilak (T) Special (Tri-Weekly) :

ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे. 

Train No. 01129  Lokmanya Tilak (T) – Thivim –  Special (Tri-Weekly) :

दिनांक 06/05/2023 ते 31/05/2023 शनिवार, सोमवार आणि बुधवार या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:50 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता थीवी या स्थानकावर पोहोचेल.

Train No. 01130 Thivim- Lokmanya Tilak (T) –  Special (Tri-Weekly) :

दिनांक 07/05/2023 ते 01/06/2023 रविवार , मंगळवार आणि गुरुवार या दिवशी ही गाडी थीवी या स्थानकावरुन संध्याकाळी 16:40 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल

या गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.

डब्यांची संरचना

टू टायर एसी + फर्स्ट एसी (एकत्रित) – 01 + टू टायर एसी – 01 + थ्री टायर एसी – 02  + सेकंड  स्लीपर – 10 + जनरल – 02 + एसएलआर – 01 + जेनेरेटर व्हॅन   असे मिळून एकूण 18  डबे

आरक्षण

Trains no. 01130 Thivim – Lokmanya Tilak या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 04 मे 2023 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत. 

   

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search