Guhagar: गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव टेम्पो शिरल्याने मोठा अपघात; २ ठार तर १५ जखमी

रत्नागिरी : जिल्ह्यात गुहागर तालुक्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणेश विसर्जन मिरवणूक शिरल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे गणेश मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागले आहे.
कोमल नारायण भुवड (वय १७) आणि दीपक लक्ष्मण भुवड (वय ४८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हा प्रकार टेम्पो ड्रा यव्हरच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो मधून उडी मारून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या ड्रायव्हरच्या अंगावरून टेम्पो गेला. तसेच समोर नाचत असलेल्या भाविकांना या टेम्पोची जोरदार धडक बसली. या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये बसलेल्या १७ वर्षीय मुलीच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यामधील जखमी झालेला चालक दीपक याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचाराकरिता त्याला डेरवण येथे नेण्यातयेत होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search