कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या म्हैशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती.या घटनेमुळे आधीच विस्कटलेले रेल्वेचे रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशींचे मृतदेह बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
Facebook Comments Box
Related posts:
ऐन गणेशचतुर्थीच्या तोंडावर रेल्वेचे दोन ब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांचे वेळापत्रक ...
कोकण
Sindhudurg: जिल्ह्यात ४३ गावांत दरडी कोसळण्याचा धोका, कोकण रेल्वे, राज्य, राष्ट्रीय महामार्गावर मार्...
कोकण रेल्वे
Konkan Railway: तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
कोकण