कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा निर्णय निवडणुकीनंतरच – रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना गुरुवारी हुबळी येथील रेल सौधा येथे आढावा बैठकीच्या अध्यक्षतेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणालेत .

यापूर्वी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात या प्रस्तावाला विरोध झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर या प्रस्तावावर पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

कोकण रेल्वे कार्पोरेशन ही स्वतंत्र संस्था असल्याने तिला मिळणार्‍या नफ्यातच विकासकामे करावी लागतात त्यामुळे त्यावर मर्यादा येतात. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेसाठी कोणतीही तरतूद केली जात नाही आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या अनेक लाभांपासून कोकण रेल्वेमार्ग वंचित राहिला आहे. अनेक समस्यांनी घेरलेल्या आणि कर्जबाजारी असलेल्या कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे अशी मागणी आता महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांनी करण्यास सुरवात केली आहे. अलीकडेच कोकण रेल्वेच्या विलिनीकरणा संदर्भात मुंबई मध्ये अखंड कोकण रेल्वे सेवा समितीची पत्रकार परिषदे संपन्न झाली होती. या परिषदेत कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाच्या मागणीवर जोर देण्यात आला होता.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search