सरकारी कार्यालयात यापुढे ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’…… शासनाचे परिपत्रक जाहीर.

Vande Mataram News : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून राज्यभरात ‘हॅलो नव्हे – वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ केला जाईल . यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्” नी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आला असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार असे म्हणाले.

आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास ‘हॅलो’ या शब्दाने सुरुवात होते. हा शब्द म्हणजे फक्त पाश्चात्यांचे अनुकरण आहे. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर “वंदे मातरम्” हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साहाय्याने हे अभियान यशस्वी करू असा निर्धार केला आहे असे ते पुढे म्हणाले.

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search