गणेशोत्सवातील प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता गाडी क्रमांक ०७६०७/०७६०८ नांदेड-हडपसर गणपती स्पेशल ट्रेन २० सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी रोडपर्यंत वाढवावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
मराठवाडा आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी बळकट करण्यासाठी ही ट्रेन मनमाड-दौंड मार्गे चालवण्याची विनंती त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
Follow us onगणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. हीच परिस्थिती लक्षात घेऊन नांदेड-हडपसर गणपती स्पेशल ट्रेन (गाडी क्र. ०७६०७/०७६०८) २० सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी रोडपर्यंत extended करण्यात यावी. जालना-छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण निलाबाई वैजिनाथराव काळे यांनी यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून ही आग्रही विनंती केली आहे.
सध्या जाहीर करण्यात आलेल्या नांदेड-सावंतवाडी रोड स्पेशल रेल्वेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, ज्यावरून मराठवाडा आणि कोकण या दोन महत्त्वाच्या भागांना थेट जोडणाऱ्या रेल्वे सेवेची किती तीव्र गरज आहे हे स्पष्ट होते. सणासुदीच्या दिवसांत होणारी गर्दी आणि वाढती मागणी पाहता, प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेल्वे फेऱ्या आणि क्षमता उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, मनमाड आणि शिर्डी यांसारख्या भागांतून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने ही विशेष ट्रेन मनमाड-दौंड मार्गे सावंतवाडीपर्यंत चालवली गेल्यास या सर्व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणे शक्य होईल.
ही गाडी सावंतवाडीपर्यंत विस्तारित केल्यास पनवेल, पेण, रोहा, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली आणि कुडाळ या महत्त्वाच्या स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांना थेट प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध होईल. यामुळे कोकणातील प्रवाशांना मराठवाड्यातील विविध प्रमुख शहरांशी संपर्क साधणे देखील अत्यंत सोपे आणि सोयीचे होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सध्याच्या गाड्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी ही मागणी तातडीने मंजूर करावी, असे खा. डॉ. कल्याण काळे यांनी नमूद केले आहे. या प्रस्तावावर प्राधान्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, यासाठी हे पत्र नांदेड विभाग, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.


