जनरल तिकिटावर स्लीपर श्रेणीचा प्रवास! मुंबई सावंतवाडी दरम्यान धावणार गणपती स्पेशल अनारक्षित स्लीपर एक्सप्रेस

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. येत्या १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ या दोन दिवशी संपूर्ण अनारक्षित (Unreserved) स्वरूपाची ‘गणपती विशेष ट्रेन’ चालवली जाणार आहे. या गाडीसाठी प्रवाशांना सुपरफास्ट दराचे अनारक्षित तिकीट जवळच्या स्टेशनवरील तिकीट खिडकीवरून किंवा ‘RailOne’ या मोबाईल ॲपवरून सहज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

​या विशेष सेवेअंतर्गत गाडी क्रमांक ०१००९ ‘मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड’ ही ट्रेन १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतून दुपारी १:४५ वाजता निघेल. ही गाडी कोकण मार्गावरून प्रवास करत दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ३:०० वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल. या प्रवासादरम्यान मुंबई आणि ठाण्यातील प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

​परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०१० ‘सावंतवाडी रोड – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ ही विशेष ट्रेन १३ आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी चालवण्यात येईल. ही गाडी सावंतवाडी येथून पहाटे ४:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ६:१५ वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकात पोहोचेल. या वेळेमुळे कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

​प्रवाशांच्या सुविधेसाठी या विशेष ट्रेनला कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांचा समावेश आहे.

​या संपूर्ण गाडीची रचना ही २० अनारक्षित/जनरल डब्यांची असणार आहे. यामध्ये १२ अनारक्षित स्लीपर कोच, ६ सामान्य द्वितीय श्रेणी (अनारक्षित) डबे आणि २ एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल. रेल्वेच्या अद्ययावत वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES व RailOne ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search