मुंबई : पुणे मंडळामार्फत म्हाडा च्या विविध योजनतील २७८ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज पार पाडण्यात आली. ह्या सोडतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला.
विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या सोडतीमधील विजेत्यांचे आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे म्हाडाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित केले असून खालील लिंक वर क्लिक करून आपण ती यादी पाहू शकता.
https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/P17/draw/P17.html
Facebook Comments Box
Related posts:
"राणेंना संपवता संपवता....." नितेश राणे यांच्या शपथविधीनंतर निलेश राणे यांची ती पोस्ट चर्चेत
महाराष्ट्र
Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणू...
कोकण
Weather Updates: पुढील २४ तास महत्त्वाचे! मुंबईसह कोकणातील किनारपट्टी जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' जारी
महाराष्ट्र