मुंबई-सावंतवाडी नवीन नियमित गाडीचे सावंतवाडीत उत्साहात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी (ता. ०९): मुंबई ते सावंतवाडी दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या नियमित रेल्वेसेवेचे सावंतवाडी रोड स्थानकावर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. गाडी स्थानकात दाखल होताच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने इंजिनचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करत लोको पायलट शैलेश पालकर व असिस्टंट लोको पायलट प्रवीण पारावे यांचा सत्कार करण्यात आला. प्रवासी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. स्थानकावर उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून या नव्या रेल्वेसेवेचा आनंद साजरा करण्यात आला.

​गाडी क्रमांक १५०८७ ही ट्रेन काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (CSMT) सावंतवाडीकडे रवाना झाली होती. ही गाडी दुपारी निर्धारित वेळेपूर्वीच सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचल्यामुळे रेल्वेप्रेमी आणि प्रवाशांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. तुतारी एक्सप्रेसनंतर सावंतवाडी स्थानकातून आणखी एका नियमित रेल्वेची भर पडल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त करत या सेवेसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे आभार मानले. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही गाडी सुरू झाल्याने मुंबईतील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे.

​या स्वागत सोहळ्यास कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मिहीर मठकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, अभिमन्यू लोंढे, नितीन गावडे, तेजस पोयेकर, प्रेरणा पोकळे, यूट्यूबर चिन्मय कोळे, उदय नाईक यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search