वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटाचे दर निम्म्याने कमी होणार; रेल्वे करणार ‘हा’ बदल..

Vande Bharat Express News :वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास महाग, ती फक्त श्रीमंतासाठी बनवण्यात आली आहे अशी टीका नेहमीच वंदे भारत ट्रेन विरोधात केली जात आहे. या टीकेला सरकारने गांभीर्याने घेतले असून वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सर्वसामान्य नागरिकांना पण घेता येईल या दिशेने प्रयत्न चालू केले आहेत. याचाच एक भाग म्हणुन रेल्वे प्रशासन येत्या ऑक्टोबर महिन्यापासून नॉन एसी वंदे भारत ट्रेन चालू करणार आहे. यामुळे अगदी स्वस्तात आरामदायी प्रवास आता करणं शक्य होणार आहे. या वर्षात दोन नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. ICF चेन्नईकडून वंदे भारत नव्या स्वरुपात आणण्याची योजना आखण्यात येत आहे. दरम्यान, वेगाने, आरामदायी आणि अगदी वाजवी दरात प्रवाशांना प्रवास करता येण्यासाठी ही नॉन एसी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आता धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची बाह्य रचना ही थोडी वेगळी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामध्ये आरामदायी प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा देखील उपलब्ध असणार आहे. या गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधा असणार आहे. तर या ट्रेनमधील टॉयलेट देखील वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असणार आहेत. दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील असणार आहे. या ट्रेनला एलएचबी कोच असणार आहेत.

एसी वंदे भारत पेक्षा वेग कमी

एसी वंदे भारतपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा वेग कमी असणार आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग हा 130 किमी असणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा ताशी 160 किमी इतका आहे. यावर बोलतांना रेल्वे मंत्रालयाने म्हटलं की, रेल्वेच्या खिडक्या उघड्या असताना जास्त वेगाने रेल्वे चालवणे हे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे या रेल्वेचा वेग एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.

सध्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून सामान्य लोकांसाठी ही नॉन एसी वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. तिकिटांचे दर किती असतिल हे जाहीर केले नसले तरी सध्या चालविण्यात येणार्‍या वंदे भारत एक्सप्रेस च्या तिकिट दरापेक्षा निम्मे किंवा त्याच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. यामध्ये स्लिपर कोचची देखील सुविधा देण्यात येणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search