गणेशोत्सव विशेष गाडी मडुरे स्थानकावर थांबणार

Konkan Railway News :प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मडुरे स्थानकावर एका विशेष गाडीला थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव दरम्यान 13.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत दररोज धावणारी हि गाडी मडुरे या स्थानकावर थांबणार असून तिची या स्थानकावरील वेळ रात्री १०:५२  आहे.
01152 स्पेशल मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान 13.09.2023 ते 02.10.2023  दररोज धावणारी हि गाडी मडुरे या स्थानकावर थांबणार असून तिची या स्थानकावरील वेळ पहाटे ०४:२४ आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या प्रयत्नांना यश 
गेल्याच आठवड्यात गणपती स्पेशल गाडीस थांबा मिळावा यासाठी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे आणि स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण केले होते. मात्र कोरेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक रविंद्र कांबळे यांनी तसे  आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. कोरेच्या गणपती स्पेशल गाड्यांच्या वेळापत्रकात तसे प्रसिद्ध न झाल्यास ३० ऑगष्ट नंतर थेट रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला गेला होता.  या मागणीव्यतिरिक्त  मडुरे स्थानकावर कोकणकन्या एक्सप्रेसला थांबा मिळावा. तसेच तुतारी एक्सप्रेस मडुरा स्टेशनवरुन सोडावी अशी मागणी दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search