सिंधुदर्ग :जिल्ह्यातील युवा दशावतारी कलाकार ओंकार रामचंद्र उर्फ शांती कलिंगण (वय ३० वर्षे) यांचे आज गोवा येथील बांबुळी रुग्णालयात सोमवारी सकाळी उपचार चालू असताना निधन झाले. त्यांचा अकाली निधनाने दशावतार क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
विनोदी आशयाचा खलनायक अशी त्यांची ओळख होती. कलेश्वर दशावतारी ह्या त्यांचा नाट्यमंडळात ते कार्यरत होते. नेरूर येथील देसाईवाडा येथील ते रहिवासी होते. कैलासवासी बाबी कलिंगण यांचे ते नातू होते. अलीकडेच शांती कलिंगण यांचे काका सुधीर कलिंगण यांचे निधन झाले होते त्या धक्क्यातून सावरत असताना कलिंगण कुटुंबाला अजून एक धक्का लागला आहे. त्यांचा जाण्याने कोकणातील दशावतार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे
Facebook Comments Box