क्रिकेटप्रेमींना खुशखबर.. वर्ल्डकपचे सामने थिएटर मध्ये पाहता येतील…

मुंबई :तुम्हाला क्रिकेटची आवड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही T20 वर्ल्ड कपचे मॅच थिएटर देखील पाहू शकता. मल्टिप्लेक्स कंपनी INOX ने ICC सोबत वर्ल्डकपसंदर्भात करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतातील सर्व सामने आपल्या आता थिएटरमध्ये दाखवणार आहेत. याशिवाय सेमीफायनल आणि फायनलचे सामनेही थिएटरमध्ये दाखवण्यात येण्याची सोय करण्यात आली आहे.

 

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास 25 शहरांमध्ये जिथे INOX चे स्क्रीनिंह होतात. त्या ठिकाणी T20 वर्ल्डकप 2022 मध्ये होणाऱ्या भारताच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग करण्यात येईल. अशा परिस्थितीत भारताचे सामने मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असणाऱ्या चाहत्यांसाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे. 

येत्या रविवारपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 16 टीम या स्पर्धेचा भाग असणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार असून तो पाकिस्तानसोबत आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला या सामन्याची उत्सुकता लागलीये. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलीये.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search