Marathi Cinema News:बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ हा चित्रपट अकराव्या दिवशीही गर्दी खेचत आहे. अकरा दिवसांत जवळपास ३५.७७ कोटी रुपयांची एकूण कमाई चित्रपटाने केली आहे.
फक्त ११ दिवसांत ३५.७७ कोटी रुपये कमाई करून असा विक्रम करणारा हा मराठीतील पहिला चित्रपट ठरला आहे. ह्या आधी हा रेकॉर्ड रितेशच्याच ‘लय भारी’ ह्या चित्रपटाच्या नावावर होता.
वेडमध्ये जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad