”जोपर्यंत खड्ड्यात तुमचा पाय….” महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून देण्यात आला कोकणवासियांना मेसेज… .

Mumbai Goa Highway : कोकणवासीयांना त्रास देणारा आणि येथील राजकारण्यांना शरमेने मान खाली घालाव्या लागणार्‍या मुंबई गोवा महामार्गाचा विषय महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी विनोदी मालिकेत सुद्धा चांगलाच गाजला आहे. ज्या विनोदी मालिकेत प्रेक्षकांना हसवण्यात येते त्याच विनोदी मालिकेत हा गंभीर विषय दाखविण्यात आला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे हा कधीच विनोदाचा विषय होऊ शकत नाही यात वाद नाही. कारण या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मात्र या विनोदी मालिकेत या विषयाचे भांडवल न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने  कोकणातील जनतेला एक स्पष्ट मेसेज देण्यात आला आहे. ‘मी एकटा काय करणार?’ ह्या विचाराने कित्येक कोकणवासिय या प्रश्नावर गप्पच असल्याने हा विषय सुटत नाही. या प्रश्नासाठी प्रत्येकाने आपल्या परीने सुरवात केली पाहिजे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search