रत्नागिरी :आज मुख्यमंत्री एकनाथ यांचा रत्नागिरी दौरा होता. ह्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती.
- मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फील्ड रस्ता करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे आदेश.
- MMRDA प्रमाणेच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार
- मत्स्य व्यवसायातून परकीय चलन उपलब्ध होण्यासाठी तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेणार.
- पर्यटन वाढीसाठी ‘बांधा आणि वापरा’ तत्वावर सेवा सुविधा पुरवल्या जातील.
- कोकण विभागातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत निर्णय घेतले जातील.
Facebook Comments Box
Vision Abroad