बुधवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; ‘या’ गाड्यांवर परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) दिनांक २३ ऑगस्ट रोजी सुटणार्‍या गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसला रोहा ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.

2) दिनांक २२ ऑगस्ट रोजी सुटणार्‍या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसला उडुपी – कणकवली दरम्यान सुमारे तीन तास रोखून ठेवले जाणार आहे.

3) दिनांक २३ ऑगस्ट रोजी सुटणार्‍या गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा जं. एक्स्प्रेसला सावंतवाडी रोड – कणकवली दरम्यान सुमारे तीस मिनिटे रोखून ठेवले जाणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search