Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी डिसेंबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणार्या ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या सप्टेंबर अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा डिसेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने प्रत्येकी २६ प्रमाणे या गाडीच्या एकूण ५२ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक २८ डिसेंबर २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक २९ डिसेंबर २०२४ पर्यंत या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी
Facebook Comments Box
Related posts:
महत्वाचे: सोमवारपासून कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक लागु होणार; रेल्वेने जाहीर केलेले वेळापत्रक ये...
कोकण
बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सुमन विद्यालय टेरव येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
कोकण रेल्वे
Landslide on Railway Track: कोकणकन्या उशिराने, दिवा रत्नागिरी पॅसेंजर रद्द, मत्स्यगंधा व अन्य गाड्या...
कोकण
Vision Abroad