सिंधुदुर्गातील १९८ गावे ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ म्हणून प्रस्तावित; यादी ईथे पहा

   Follow us on        

​केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत २७ जुलै रोजी पश्चिम घाट परिसराबाबत एक महत्त्वाची मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नव्या मसुद्यानुसार राज्यामधील १३ जिल्ह्यांमधील ५६ तालुक्यांमधील तब्बल २ हजार ५१५ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजेच इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश करण्याची योजना आखण्यात आली आहे.

​या प्रस्तावित फेरबचतीमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. या जिल्ह्यामधील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाच महत्त्वाच्या तालुक्यांमधील एकूण १९८ गावांचा यामध्ये समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

​संबंधित पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ अंतर्गत असलेल्या नियमांच्या आधारे ही अधिसूचना जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या कालावधीत नागरिकांना आपल्या सूचना किंवा हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आक्षेप व सूचना थेट केंद्र सरकारकडे निर्धारित वेळेत पाठवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

​ही संपूर्ण अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी https://egazette.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे प्रभावित होणारे स्थानिक रहिवासी, ग्रामस्थ तसेच विविध संस्थांना आपल्या हरकती नोंदवण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

​नागरिकांना आपल्या हरकती व सूचना पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर टपाल सेवेद्वारे पाठवता येणार आहेत. तसेच यासंदर्भातील माहिती व कागदपत्रे [email protected] या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवावीत, अशी सविस्तर माहिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

येथे सिंधुदुर्गमधील १९८ प्रस्तावित गावांची यादी दिली आहे

​सिंधुदुर्ग :- १९८ प्रस्तावित गावे

​१) देवगड :- २१ गावे

आरे, चाफे, ढालवली, गडितम्हणे, हडपिड, खुडी, कुवळे, लिंगदळ, महाळुंगे, नाड, निमतवाडी, फणसगाव, पोंभुर्ले, रेंबवली, साळशी, शेरीघेरा कामते, शेवरे, शिरावली, तांबळडेग, वाघिवरे, वेळगवे.

२) कणकवली :- ३९ गावे

आयनल, भैरवगाव, भारणी, भिरवंडे, दामरे, दारिस्ते, दारूम, धारेश्वर, दिगवळे, गांधीनगर, घोंसारी, हरकुळ खुर्द, हुंबरणे, जांभळगाव, जांभळनगर, कळसुली, कासवन, कोळोशी, कोंडये, कुंभवडे, माईण, नागसावंतवाडी, नडवडे, नाटळ, ओसरगाव, ओझरम, फोंडाघाट, पिंपळगाव, पिसे कामते, रामेश्वरनगर, रांजणगाव, सावडाव, शेरपे, शिरवल, तरंदळे, उत्तर बाजार पेठ, वरवडे, वांगणी, येवतेश्वरगाव.

​३) कुडाळ :- ५० गावे

आकेरी, आंबेरी, अंजिवडे, आवळेगाव, भडगाव बुद्रुक, भडगाव खुर्द, भरणी, भातगाव, भूतवड, चाफेली, दुर्गानगर, गांधीग्राम, गावळगाव, घाडीगाव, घोटागे, गिरगाव, गोठोस, हिरलोक, जांभवडे, कडावल, कालेली, कंदुळी, केरावडे, किनळोस, कुपावडे, कुसागाव, माडगाव, मोरे, मुड्याचा कोंड, मुणगे, नरूर, नेरूर, निळेली, निरुखे, निवाजे, पडावे, पांदुर, पांग्रड, पुळस, रुमाडगाव, साकिर्डे, शिवापूर, सोनवडे तर्फ कळसुली, तळीगाव, तेंडोली, उपवडे, वाडोस, वालावल, वारदे, वासोली.

​४) सावंतवाडी :- ५१ गावे

आंबेगाव, आंबोली, आरोस, असनिये, बांदा, बावलत, भोम, ब्राह्मणपट, चराथे, चौकळ, दाभील, दांडोली, दानोली, देगाव, देवसू, डिंगणे, डोंगरपाळ, फणसावडे, गाळेळ, गेळे, घारप, गुळदुवे, कलंबिस्ट, कारीवडे, केगद, केसरी, कोणास, कोंडुरे, कुंभवडे, कुणकेरी, माडखोल, मादुरा, मजगाव, मसुरे, नेने, निरुखे, ओवाळीये, पडवे, पडवे मजगाव,ारपोळी, रोणापाळ, सांगली, सरमळे, साटार्डा, साटेली तर्फ साटार्डा, सावंतवाडी (नगरपालिका), सावरवाड, शिरशिंगे, तांबोळी, उदेली, वेर्ले.

​५) वैभववाडी :- ३७ गावे

आचिर्णे, ऐनारी, आखावणे, अरुळे, भट्टीवाडी, भोम, भुईबावडा, भुयाडेवाडी, जांभवडे, जामदारवाडी, करूळ, खांबळे, कुंभारी, कुंभारवाडी, कुंभवडे, कुर्ली, मधलीवाडी, मांडवकरवाडी, मोहितेवाडी, मौंडे, नारकरवाडी, नवले, नेरले, निम अरुळे, पालंदेवाडी, पिंपळवाडी, रिंगेवाडी, सादुरे, सांगुळवाडी, शिराळे, टेंबेवाडी, तिरवडे तर्फ खारेपाटण, तिरवडे तर्फ सौंदळ, उपळे, वभावे, वयंबोशी, येडगाव.

एकूण :- २१ + ३९ + ५० + ५१ + ३७ = १९८ गावे.

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search