महाराष्ट्रात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार; जाणून घ्या जिल्हावार राष्ट्रध्वजारोहण करणार्‍या लोकप्रतिनिधींची नावे

   Follow us on        

मुंबई: आगामी शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यातही भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृत शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून, राज्यातीव विविध ठिकाणी ध्वजारोहण करणाऱ्या मानवरंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

​या नियमावलीनुसार, राज्याचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईतील मंत्रालय येथे पार पडणार असून, सकाळी ९:०५ वाजता मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण केले जाईल. तसेच, पुणे येथे राज्यपाल महोदयांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जाईल. याशिवाय कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात कु. आदिती वरदा सुनील तटकरे, मा. मंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होईल.

​राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि मंत्री राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, बीड जिल्ह्यात श्रीमती सुनेत्रा अजित पवार, नागपूरमध्ये श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णाराव बावनकुळे, तर अहिल्यानगर जिल्ह्यात श्री. राधाकृष्ण सिंदूताई एकनाथराव विखे-पाटील ध्वजारोहण करतील.

​तसेच नंदूरबारमध्ये श्री. हसन सकिना मियालाल मुश्रीफ, सांगलीत श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील, नाशिकमध्ये श्री. गिरीश गिता दत्तात्रय महाजन, पालघरमध्ये श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक, जळगावमध्ये श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील आणि अमरावती येथे श्री. दादाजी रेशमाबाई दगडू भुसे हे राष्ट्रीय ध्वज फडकवतील. यवतमाळमध्ये श्री. संजय प्रमीला दुलीचंद राठोड, रत्नागिरीत श्री. उदय स्वरूपा रविंद्र सामंत, धुळे येथे श्री. जयकुमार नयनकुवर जितेद्रसिंह रावल, जालना येथे श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, नांदेडमध्ये श्री. अतुल लिलावती मोरेश्वर सावे, आणि चंद्रपूर येथे डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके ध्वजारोहण संपन्न करतील.

​सातारा जिल्ह्यात श्री. शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई, मुंबई उपनगरमध्ये अॅड. आशिष मिनल बाबासी शेलार, वाशिममध्ये श्री. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे, लातूरमध्ये श्री. शिवेंद्रसिंह अरुणारaje अभयसिंहराजे भोसले, सोलापूरमध्ये श्री. जयकुमार कमल भगवानराव गोरे, तर हिंगोलीत श्री. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवळ हे ध्वजारोहण करणार आहेत. छञपती संभाजीनगरमध्ये श्री. संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, धाराशिवमध्ये श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, रायगडमध्ये श्री. भरत विठाईबाई मारुती गोगावले, बुलढाणामध्ये श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील), तर सिंधुदुर्गात श्री. नितेश निलम नारायण राणे राष्ट्रध्वज फडकवतील.

​अकोल्यात श्री. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर, कोल्हापूरमध्ये श्री. प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर, गडचिरोलीत श्री. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल, भंडारा येथे श्रीमती माधुरी मिरा सतीश मिसाळ, वर्धा येथे डॉ. पंकज कांचन राजेश भोयर, परभणीमध्ये श्रीमती मेघना दिपक साकोरे – बोर्डीकर आणि गोंदिया येथे श्री. इंद्रीनील अनिता मनोहर नाईक हे आपापल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करतील.

​दरम्यान, जर एखाद्या पालकमंत्री वा मंत्र्यांना काही अपरिहार्य कारणांमुळे ठरलेल्या वेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे शक्य झाले नाही, तर विभागीय मुख्यालयात ‘विभागीय आयुक्त’ आणि जिल्हा मुख्यालयात ‘जिल्हाधिकारी’ यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पाडले जाईल, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search