सावंतवाडी: येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेले चार दिवस सावंतवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराधीन होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. खानोलकर यांनी सावंतवाडीतील गांधी चौक परिसरात आपला दवाखाना चालवत गेली ६० हून अधिक वर्षे या क्षेत्रात वैद्यकीय सेवा दिली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Facebook Comments Box


