शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा कोकणवर अन्याय करणारा!

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा असल्याची भूमिका माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी मांडली आहे. हा महामार्ग थेट गोव्याला जोडला जात असताना, त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले असून, सद्यस्थितीतील आराखड्यामुळे कोकणातील स्थानिक विकासाला खीळ बसण्याची भीती व्यक्त केली आहे.

​केसरकर यांच्या मते, नागपूरहून येणारा पर्यटक जर थेट गोव्याला निघून गेला, तर कोकणच्या पर्यटनाला त्याचा कोणताही लाभ होणार नाही. कोकणात उत्कृष्ट समुद्रकिनारे आणि बंदरे असताना महाराष्ट्रातील माल निर्यातीसाठी गोव्याच्या बंदराचा वापर का व्हावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा मार्ग आजऱ्यावरून रेडी बंदराला जोडल्यास त्याचा मोठा फायदा होईल. तसेच, कोकण कोस्टल रोड विरारपासून या मार्गाला जोडला जाणार असल्याने, पर्यटकांना पत्रादेवीमार्गे जाणे सहज शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.

​शक्तीपीठ महामार्ग केवळ चंदगडवरून गोव्याला जोडला जाऊ नये, असे स्पष्ट करत केसरकर यांनी सुचवले की, त्याचा एक फाटा तिलारी मार्गे उत्तर गोव्याला आणि दुसरा फाटा दक्षिण गोव्याला जोडला जाऊ शकतो. यामुळे चंदगड आणि दोडामार्ग तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. तसेच, हा फोरलेन हायवे चंदगड-दोडामार्गे नेल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल आणि आंबोली, फणसवडे, केसरी यांसारख्या ‘इको सेन्सिटिव्ह’ भागातून बोगदा काढल्यास निसर्गाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या विषयावर त्यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि चंदगडच्या आमदारांशीही चर्चा केली असल्याचे सांगितले.

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search