रेल्वेचा अजब कारभार! मंगलोर एक्सप्रेसचा सावंतवाडी स्थानकावरील थांबाच गायब

 सावंतवाडी: कोकण रेल्वेचे २१ ऑक्टोबरपासून बिगर पावसाळी नियमित वेळापत्रकाचे आरक्षण सुरू झाल्यापासून तीन दिवस झाले तरीही नव्याने थांबा मंजूर झालेल्या मंगलोर  एक्सप्रेसला सावंतवाडी स्थानकावर थांबा दाखवत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गाडीला सावंतवाडी टर्मिनसला अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, २१, २२ आणि आता २३ ऑक्टोबरचेही रेल्वे बुकिंग सुरू झाले असूनही, रेल्वेच्या अधिकृत बुकिंग ॲप किंवा साईटवर या गाडीचा सावंतवाडी थांबा आणि वेळेची माहिती अद्यापही अपडेट करण्यात आलेली नाही.

​टाईमटेबल बदलून आणि नवीन बुकिंग सुरू होऊनही फक्त १२१३३ मँगलोर एक्सप्रेसचा सावंतवाडी टर्मिनसचा थांबा ऑनलाइन प्रणालीत दाखवला जात नसल्यामुळे सावंतवाडीकर प्रवासी दोन महिने अगोदर सुरू होणाऱ्या आरक्षणाच्या सुविधेपासून वंचित राहत आहेत. कोकण रेल्वेच्या या स्पष्ट हलगर्जीपणामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून याचा थेट परिणाम सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या तिकीट विक्रीवर होत आहे.

इतर सर्व गाड्यांचे टाईमटेबल अपडेट झाले असताना फक्त या एकाच गाडीबाबत होत असलेल्या या दिरंगाईमुळे “सावंतवाडीकरांनी नक्की तिकीट बुकिंग कसे करावे?” असा गंभीर प्रश्न प्रवाशांसमोर उभा ठाकला आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही तांत्रिक त्रुटी सुधारावी आणि मँगलोर एक्सप्रेसचे बुकिंग सावंतवाडीसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search