प्रतिनिधी, मुंबई:
प्रवाशांची वाढती गर्दी आणि अतिरिक्त मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने (अहमदाबाद मंडळ) अहमदाबाद – मंगळुरू वीकली स्पेशल ट्रेन (गाडी संख्या ०९४२४) च्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही विशेष ट्रेन ३१ जुलै २०२६ पर्यंत धावणार आहे.
गाडीचे वेळापत्रक आणि तपशील:
गाडी क्रमांक: 09424 (अहमदाबाद ते मंगळुरू)
दिवस आणि वेळ: ही ट्रेन दर शुक्रवारी १६:०० वाजता अहमदाबादहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:०० वाजता मंगळुरूला पोहोचेल.
वाढविण्यात आलेला कालावधी: ३ जुलै २०२६ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत.
कोचची रचना (Coach Composition):
या विशेष ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी एसी २-टियर (AC 2-Tier), एसी ३-टियर (AC 3-Tier), स्लीपर क्लास (Sleeper Class), आणि जनरल सेकंड क्लास (General Second Class) कोच समाविष्ट असणार आहेत.
प्रमुख थांबे (Stops):
ही ट्रेन प्रवासादरम्यान नडियाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकंबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबेल. कोकण रेल्वे मार्ग आणि महाराष्ट्रातील प्रमुख स्थानकांवरून जात असल्याने या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बुकिंग कधीपासून?
या वाढीव फेऱ्यांसाठीचे बुकिंग ३० जून २०२६ पासून सुरू झाले आहे. प्रवासी सर्व पीआरएस (PRS) काउंटर्सवर तसेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले तिकीट बुक करू शकतात.
या ट्रेनच्या अद्ययावत माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.


