Konkan Railway: मुंबई – मडगाव मार्गावर गणेशोत्सवासाठी आणखी विशेष गाड्या जाहीर!

मुंबई:

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते मडगाव मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​गाडीची वेळ आणि वेळापत्रक

​गाडी क्रमांक व मार्ग: ०१००७ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव विशेष गाडी.

​सुटण्याची वेळ: ही गाडी शुक्रवार, ११ आणि रविवार, १३ सप्टेंबर रोजी ००:४० वाजता (गुरुवार व शनिवारी रात्री) सुटेल.

​पोहोचण्याची वेळ: ही गाडी त्याच दिवशी १५:३० वाजता मडगावला पोहचेल.

या गाडीचे थांबे

  • ​दादर
  • ​ठाणे
  • ​पनवेल
  • ​पेण
  • ​रोहा
  • ​माणगाव
  • ​वीर
  • ​खेड
  • ​चिपळूण
  • ​सावर्डे
  • ​आरवली रोड
  • ​संगमेश्वर रोड
  • ​रत्नागिरी
  • ​आडवली
  • ​विलवडे
  • ​राजापूर रोड
  • ​वैभववाडी रोड
  • ​नांदगाव रोड
  • ​कणकवली
  • ​सिंधुदुर्ग
  • ​कुडाळ
  • ​सावंतवाडी रोड
  • ​थिवी
  • ​करमळी

​आरक्षण आणि तिकीट बुकिंग

​आरक्षण सुरू होण्याची तारीख: शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून आयआरसीटीसी (IRCTC) आणि RailOne वर आरक्षण सुरू होईल.

​महत्त्वाची टीप: या गाडीच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा RailOne अथवा NTES ॲप डाऊनलोड करा. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ॲपचा वापर केल्यास अधिकृत माहिती मिळेलच याची शाश्वती नाही.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search