आत्महत्या करायला गेलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

छत्रपती संभाजीनगरमधील शिगाव येथील खवड्या टेकडीवर एका १७ वर्षीय तरुणाने नवीन मोबाईल फोनच्या वादातून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मुलाला टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी गावकऱ्यांनी आणि त्याच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले, मात्र वाद विकोपाला गेला आणि मुलगा टेकडीवरून खाली कोसळला.

​वडिलांनी मुलाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु मुलगा खाली पडत असताना त्याने वडिलांच्या हाताला धरून त्यांनाही आपल्यासोबत ओढले. त्यामुळे वडीलही खाली कोसळले आणि या भीषण घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

​पती आणि मुलाला अशा अवस्थेत कोसळताना पाहून दुःखी झालेल्या मातेने त्यांना वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली, मात्र दुर्दैवाने तिचा पाय घसरल्यामुळे ती देखील खोल दरीत पडली.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण केले आणि त्यानंतर ते नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहेत. सध्या या संपूर्ण दुर्दैवी प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत केला जात आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search