Konkan Railway : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने अहमदाबाद जंक्शन ते मंगळूरू जंक्शन दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष ट्रेनच्या (Train No. 09424 / 09423) फेऱ्यांच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०९४२४ (अहमदाबाद – मंगळूरू जंक्शन साप्ताहिक विशेष): ही ट्रेन आता २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, दर शुक्रवारी नियमितपणे धावेल.
गाडी क्रमांक ०९४२३ (मंगळूरू जंक्शन – अहमदाबाद साप्ताहिक विशेष): ही ट्रेन २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, दर शनिवारी धावेल.
वेळापत्रक आणि पावसाळी/विना-पावसाळी वेळा:
दोन्ही गाड्या १६ ऑक्टोबर २०२६ (गाडी क्र. ०९४२४) आणि १७ ऑक्टोबर २०२६ (गाडी क्र. ०९४२३) पर्यंत सध्याच्या पावसाळी वेळापत्रकानुसार धावतील.
२३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या फेऱ्यांसाठी नवीन विना-पावसाळी (Non-Monsoon) वेळापत्रक लागू होईल:
गाडी क्र. ०९४२४: अहमदाबादहून दर शुक्रवारी दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०:०० वाजता मंगळूरू जंक्शनला पोहोचेल (२३ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२६).
गाडी क्र. ०९४२३: मंगळूरू जंक्शनहून दर शनिवारी रात्री २२:३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०२:१५ वाजता अहमदाबाद जंक्शनला पोहोचेल (२४ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६).
प्रमुख थांबे:
ही विशेष ट्रेन नडियाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जंक्शन, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदानपूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल या स्थानकांवर थांबेल.
प्रवाशांनी या विस्तारित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नरकार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.


